Announcement

Notice Board

Events

राज्यस्तरीय आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा - २०२४

आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात येत आहे.

विषय:

  • ‘टाळी’ आणि न्याय – प्रतिक्षा पिढ्यांची….
  • विरोधी पक्षाचे अस्तित्व: लोकशाहीची लिटमस टेस्ट
  • फँड्री ते सैराट : आधुनिक मानसिकतेची मागास पाऊलवाट
  • काय करु आता धरुनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले ॥
  • माझ्या मराठीची बोलू कौतुके- पण इंग्रजीत !

पारितोषिके:

  • प्रथम क्रमांक – १०,०००/- रूपये रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
  • द्वितीय  क्रमांक -७०००/- रूपये रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
  • तृतीय क्रमांक– ५०००/- रूपये रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
  • दोन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी २०००/- रुपये रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक

नियम अटी:

  • प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी ७ (५+२) मिनिटे वेळ देण्यात येईल.
  • स्पर्धेचे माध्यम मराठी राहील.
  • या स्पर्धेत कोणत्याही महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, परंतु स्पर्धकाचे वय २५ पेक्षा जास्त नसावे.
  • स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून जास्तीतजास्त २ स्पर्धकांचा संघ पाठवावा. एकाहून जास्त संघ पाठवता येतील.
  • स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. २९५/- (२५०/- + १८% GST ) आहे.
  • स्पर्धा २०/०२/२०२४ रोजी भरविण्यात येईल. बक्षिस वितरण स्पर्धा संपल्यानंतर लगेचच करण्यात येईल.
  • स्पर्धकांनी सोमवार दिनांक १९/०२/२०२४ पर्यंत स्पर्धेसाठी फॉर्मद्वारे नोंदणी करावी.
  • प्रत्येक विद्यार्थ्याजवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सही शिक्क्याचे पत्र किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
  • स्पर्धा नियमांविषयी बदल करण्याचा अंतिम अधिकार स्पर्धा संयोजन समितीकडे राखीव आहे.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
  • स्पर्धकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे.

रजिस्ट्रेशन फॉर्म:

  • स्पर्धकांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म  न भरल्यास स्पर्धक स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद असावी.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी लिंक – https://forms.gle/1PnLqvnojzVum7YWA 
  • स्पर्धकांनी प्रथम प्रवेश शुल्क  भरून शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट (Screenshot) हा रजिस्ट्रेशन फॉर्म (Registration Form) वर अपलोड करणे अनिवार्य आहे.

स्पर्धेचा दिनांक, वेळ आणि  ठिकाण

  • दिनांक:  २०/०२/२०२४
  • वेळ:  सकाळी ०९ वाजता
  • ठिकाण:  आयएलएस विधी महाविद्यालय, लॉ कॉलेज रोड (चिपळूणकर रोड), पुणे -४११००४

स्पर्धा समन्वयक: 

  • मुग्धा हेडाऊ, सहाय्यक प्राध्यापक
  • सई ताम्हणकर, सहाय्यक प्राध्यापक

अधिक माहितीसाठी संपर्क:

  • प्रशिक राजेंद्र राक्षे  (मो.नं. ८६००१०७८५५)
  • रेणुका सतिश सुलाखे (मो.नं. ९८३४९०४८१९)