Announcement


Notice Priod


Events


Dance for A Cause

arrowApr, 1, 2022

Symposium: RERA-2020

arrowNov, 26, 2020

ILSCA WEBINAR-2

arrowJun, 10, 2020

KREEDANAGAN 2019-2020

arrowJan, 28, 2020

Alumni Meet 2018

arrowDec, 14, 2018

महत्त्वाची सूचना : शिष्यवृत्ती/फ्रीशिप सन 2023-24 (MahaDBT पोर्टल) : अर्ज जमा करण्यासाठी अंतिम मुदतवाढ : दि. २०.०३.२०२४


सर्व अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जमाती (VJNT) (अ/ब/क/ड), इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागासवर्गीय (SBC), राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांकडून शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती/फ्रीशिपसाठी सन 2023-24 करिता ऑनलाईन पध्दतीने Fresh / Renewal अर्ज https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवरून मागविण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी  स्वत: सदर शिष्यवृत्तीकरता शासनाने विहीत केलेले नियम व अटींच्या आधीन राहून ऑनलाईन अर्ज व खाली दिलेल्या फॉर्म भरून त्याची प्रत आवश्यक त्या स्व-साक्षांकित (Self-Attested) कागदपत्रांसह आय्एल्एस् विधी महाविद्यालय counter नंबर 1 येथे सकाळी 9.30 ते दुपारी 12.30  या वेळेत जमा करावी.

अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख दि. २०.०३.२०२४ आहे. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 
MahaDBT पोर्टलवर शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज जमा करण्याची तारीख विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयासाठीही  ३१ मार्च २०२४ अशी आहे. परंतु विद्यार्थ्यांनी फॉर्म जमा केल्यानंतर फॉर्म तपासण्यासाठी तसेच फॉर्ममध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दिनांक २१ मार्च ते ३० मार्च २०२४ एवढा कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म २०.०३.२०२४ पर्यंत महाविद्यालयात जमा करावेत.