Announcement

Notice Board

Events

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५-२६: दि. ३ फेब्रुवारी २०२६ 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आय्एल्एस् विधी महाविद्यालयामध्ये  मराठी वादसभा  सदैव  कार्यरत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्याचे आय्एल्एस् विधी महाविद्यालयाच्या मराठी वादसभेने योजिले आहे. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील विद्यार्थ्यांना आपले मत परखडपणे मांडण्यासाठीचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे .

 राज्यस्तरीय मराठी  वक्तृत्व स्पर्धा मंगळवार दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून आय्एल्एस् विधी महाविद्यालयामध्ये आयोजित केली असून आपल्या महाविद्यालयाने सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!

स्पर्धेचे विषय:

 १. जागतिकीकरण: सहकार्य की गुलामगिरी?

२. निसर्गाशी युध्द नाही, सहअस्तित्व हवं!

३. “मी माझं आयुष्य जगतोय की समाजाचं स्क्रिप्ट वाचतोय?”

४. नवीन तंत्रज्ञान: अपडेटेड मूल्य?

५. तिच्या पायातल्या साखळ्या सोन्याच्या केल्या, तरी पण त्या साखळ्याच!

६. “तुका म्हणे जन दुतोंडी सावज। सापडे सहज तिकडे धरी ||”

पारितोषिके:

● प्रथम क्रमांक – रु. १०,०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
● द्वितीय क्रमांक – रु. ७,०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
● तृतीय क्रमांक – रु. ५,०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
● दोन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी रु. २,०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक

नियम व अटी:

१. स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून जास्तीत जास्त २ स्पर्धक पाठवता येतील. संघ (टीम) चालणार नाही.

२. स्पर्धेचे माध्यम मराठी असेल.

३. प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी ६ मिनिटे (४+२) वेळ देण्यात येईल.

४. या स्पर्धेत कोणत्याही महाविद्यालयातील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या व पदवीधर विद्यार्थ्यांना सहभागी होता
येईल, परंतु स्पर्धकाचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

५. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क हे प्रत्येकी रु. १५०/ + १८% GST (एकूण- रु. १७७/-) असेल. स्पर्धकांनी सोमवार
दिनांक ०२/०२/२०२६ पर्यंत स्पर्धेसाठी नोंदणी अर्जाद्वारे नोंदणी करावी. कोणत्याही कारणास्तव आयत्यावेळी
स्पर्धकाची नोंदणी करता येणार नाही.

६. प्रत्येक विद्यार्थ्या जवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सहीशिक्क्याचे पत्र आणि महाविद्यालयाचे
ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.

७. स्पर्धकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे.

८. बक्षिस वितरण स्पर्धा संपल्यानंतर लगेचच करण्यात येईल.

९. राहण्याची सोय आणि प्रवासखर्चाची सर्वस्वी जबाबदारी स्पर्धकांची असेल.

१०. स्पर्धा नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम अधिकार स्पर्धा संयोजन समितीकडे राखीव आहे. परीक्षकांचा
निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

नोंदणी अर्ज (रजिस्ट्रेशन फॉर्म) :

स्पर्धकांनी नोंदणी अर्ज आणि नोंदणी शुल्क भरणे अनिवार्य आहे. त्यासाठी “Registration & Pay” tab वर जाऊन नोंदणी करावी.

स्पर्धेचा दिनांक, वेळ आणि ठिकाण:

दिनांक: ३ फेब्रुवारी २०२६, मंगळवार
वेळ: सकाळी ९.०० पासून
ठिकाण: आय्एल्एस् विधी महाविद्यालय, चिपळूणकर रोड (लॉ कॉलेज रोड), पुणे – ४११००४

स्पर्धा समन्वयक:

  • ऋग्वेद गाडगे, सहाय्यक प्राध्यापक
  • मुग्धा हेडाऊ, सहाय्यक प्राध्यापक

अधिक माहितीसाठी संपर्क :

  • मानसी सराईकर :
  • श्रीधर  मदने :

ई-मेल : [email protected]