Announcement

Notice Board

Events

मराठी वादविवाद स्पर्धा – २०२६: १४ मार्च २०२६

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आय्एल्एस् विधी महाविद्यालयामध्ये मराठी वादसभा सदैव कार्यरत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयांतर्गत घेण्यात येणारी मराठी वादविवाद स्पर्धा – २०२६ आयोजित करण्याचे आय्एल्एस् विधी महाविद्यालयाच्या मराठी वादसभेने योजिले आहे.

या वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपले मत परखडपणे मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

सदर मराठी वादविवाद स्पर्धा शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी आय्एल्एस् विधी महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी.

वादविवादासाठी प्रस्ताव:

शासनाच्या कल्याणकारी योजना : सामाजिक न्यायाभिमुख की तुष्टीचे राजकारण?

नियम:

१) सदर स्पर्धा ही आय्एल्एस् विधी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली राहील.

२) स्पर्धकांनी गटामध्ये सहभाग  नोंदवावा, प्रत्येक गटात दोन स्पर्धक असतील. एकाने विषयाच्या बाजूने तर दुसऱ्याने विषयाच्या विरुद्ध बाजूने अशाप्रकारे नोंदणी करावी.

३) प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० स्पर्धकांना (१५ संघांना) स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल.

४)  स्पर्धेचे माध्यम हे फक्त मराठी असेल.

५) स्पर्धा ही प्राथमिक व उत्स्फूर्त अशा दोन फेऱ्यांमध्ये घेतली जाईल.

६) प्राथमिक फेरीमध्ये ४ (३+१) मिनिट उत्स्फूर्त फेरीमध्ये ३ (२+१) मिनिट असा वेळ दिला जाईल. 

७) प्राथमिक फेरीमधून अधिक गुण मिळालेल्या प्रथम १० विद्यार्थ्यांची (५ संघांना) उत्स्फूर्त फेरीमध्ये निवड केली जाईल.

८) उत्स्फूर्त फेरीसाठी विषय स्पर्धेच्या १० मिनिटे आधी कळवला जाईल.

९) ज्या संघाचे प्राथमिक आणि उत्स्फूर्त अशा दोन्ही फेऱ्या मिळून अधिक गुण असतील त्यांना विजयी घोषित केले जाईल.

१०) प्राथमिक फेरी मधून सर्वाधिक गुण असलेल्या विद्यार्थाला उत्कृष्ट वक्ता हे पारितोषिक दिले जाईल.

११) स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजन समितीकडे असतील.

पारितोषिके:

  १) सांघिक –

  • विजेता –  सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
  • उपविजेता – सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
  • उत्तेजनार्थ- प्रमाणपत्र

२) वैयक्तिक  –

  • उत्कृष्ट वक्ता – सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
  • उत्तेजनार्थ उत्कृष्ट वक्ता – प्रमाणपत्र

Registration Link – https://forms.gle/m4BwYf4LH9m8MRhD7

गतवर्षीप्रमाणेच यंदाही विद्यार्थ्यांनी स्पर्धेस भरघोस प्रतिसाद द्यावा असे नम्र आवाहन.

शिक्षक समन्वयक:

  • प्रा. मुग्धा हेडाऊ
  • प्रा. ऋग्वेद गाडगे

विद्यार्थी समन्वयक:

  • अनुजा भुजबळ – 89835 39697
  • शाम घुले – 87675 32664
  • विजेता कुलकर्णी – 87672 08894
  • किरणकुमार होले – 70308 61826

स्पर्धेविषयी कोणतीही शंका किंवा अडचणी असल्यास विद्यार्थी समन्वयकांशी संपर्क साधावा.