महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेतर्फे २०२७ हे महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष, तसेच क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय, समता, मानवी हक्क इत्यादी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. ही स्पर्धा पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) अशा दोन स्वतंत्र गटामध्ये आयोजित होणार असून निबंध मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहिता येईल.
आय्एल्एस् विधी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की या निबंध स्पर्धेत जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुढील गुगल फॉर्म भरावा. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेची प्रक्रिया, नियम, व अटी कळविण्यात येतील. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी हजेरीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेचे विषय:
| पदवी (UG) | महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह: सामाजिक क्रांतीची नांदी Mahad Chavdar Tale Satyagraha: the beginning of a social revolution |
| पदव्युत्तर (PG) | महात्मा फुले यांची विचारधारा आणि समकालीन सामाजिक आव्हाने Mahatma Phule’s ideology and contemporary social challenges |
गुगल फॉर्म- https://forms.gle/4KsFaWypWSgb6UZd7