आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय आंतर–महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
विषय:
- ‘टाळी’ आणि न्याय – प्रतिक्षा पिढ्यांची….
- विरोधी पक्षाचे अस्तित्व: लोकशाहीची लिटमस टेस्ट
- फँड्री ते सैराट : आधुनिक मानसिकतेची मागास पाऊलवाट
- काय करु आता धरुनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले ॥
- माझ्या मराठीची बोलू कौतुके- पण इंग्रजीत !
पारितोषिके:
- प्रथम क्रमांक – १०,०००/- रूपये रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
- द्वितीय क्रमांक -७०००/- रूपये रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
- तृतीय क्रमांक– ५०००/- रूपये रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
- दोन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी २०००/- रुपये रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
नियम व अटी:
- प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी ७ (५+२) मिनिटे वेळ देण्यात येईल.
- स्पर्धेचे माध्यम मराठी राहील.
- या स्पर्धेत कोणत्याही महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, परंतु स्पर्धकाचे वय २५ पेक्षा जास्त नसावे.
- स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून जास्तीतजास्त २ स्पर्धकांचा संघ पाठवावा. एकाहून जास्त संघ पाठवता येतील.
- स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. २९५/- (२५०/- + १८% GST ) आहे.
- स्पर्धा २०/०२/२०२४ रोजी भरविण्यात येईल. बक्षिस वितरण स्पर्धा संपल्यानंतर लगेचच करण्यात येईल.
- स्पर्धकांनी सोमवार दिनांक १९/०२/२०२४ पर्यंत स्पर्धेसाठी फॉर्मद्वारे नोंदणी करावी.
- प्रत्येक विद्यार्थ्याजवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सही शिक्क्याचे पत्र किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
- स्पर्धा नियमांविषयी बदल करण्याचा अंतिम अधिकार स्पर्धा संयोजन समितीकडे राखीव आहे.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
- स्पर्धकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
रजिस्ट्रेशन फॉर्म:
- स्पर्धकांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
- रजिस्ट्रेशन फॉर्म न भरल्यास स्पर्धक स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद असावी.
- रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी लिंक – https://forms.gle/1PnLqvnojzVum7YWA
- स्पर्धकांनी प्रथम प्रवेश शुल्क भरून शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट (Screenshot) हा रजिस्ट्रेशन फॉर्म (Registration Form) वर अपलोड करणे अनिवार्य आहे.
स्पर्धेचा दिनांक, वेळ आणि ठिकाण:
- दिनांक: २०/०२/२०२४
- वेळ: सकाळी ०९ वाजता
- ठिकाण: आयएलएस विधी महाविद्यालय, लॉ कॉलेज रोड (चिपळूणकर रोड), पुणे -४११००४
स्पर्धा समन्वयक:
- मुग्धा हेडाऊ, सहाय्यक प्राध्यापक
- सई ताम्हणकर, सहाय्यक प्राध्यापक
अधिक माहितीसाठी संपर्क:
- प्रशिक राजेंद्र राक्षे (मो.नं. ८६००१०७८५५)
- रेणुका सतिश सुलाखे (मो.नं. ९८३४९०४८१९)