आय्एल्एस् विधी महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२४-२५
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी आय्एल्एस् विधी महाविद्यालयामध्ये मराठी वादसभा कार्यरत आहे. मराठी वादसभा वर्षभर विविध कार्यक्रम राबवत असते. वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील विद्यार्थ्यांना आपले मत परखडपणे मांडण्यासाठीचे व्यासपीठ वादसभा दरवर्षी उपलब्ध करुन देते.
या वर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा बुधवार, दि. २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता आय्एल्एस् विधी महाविद्यालयामध्ये आयोजित केली असून आपण आपल्या महाविद्यालयाचा संघ पाठवून स्पर्धेची शोभा वाढवावी, ही विनंती!
विषय:
- आता न्याय डोळस झाला !!
- आपुल्या घरात हाल सोसते मराठी
- सावित्री जन्माचे १९४ वे वर्ष आणि आजची प्रासंगिता
- प्रबळ विरोधी पक्ष हवा!!!
- वेडं होता आलं पाहिजे
- या सत्तेत जीव रमत नाही
पारितोषिके:
- प्रथम क्रमांक – रु. १०,०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
- द्वितीय क्रमांक – रु. ७,०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
- तृतीय क्रमांक – रु. ५,०००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
- दोन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी रु. १,५००/- रोख + सन्मानचिन्ह + प्रशस्तिपत्रक
नियम व अटी:
- प्रत्येक विद्यार्थ्याला भाषणासाठी ६ मिनिटे (४+२) वेळ देण्यात येईल.
- स्पर्धेचे माध्यम मराठी राहील.
- या स्पर्धेत कोणत्याही महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, परंतु स्पर्धकाचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून जास्तीत जास्त २ स्पर्धक पाठवता येईल.
- स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क हे प्रत्येकी रु. १७७/- (१८% GST सह) असेल.
- स्पर्धकांनी दिनांक २० जानेवारी २०२५ पर्यंत स्पर्धेसाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी. कोणत्याही कारणास्तव आयत्या वेळी स्पर्धकाची नोंदणी करता येणार नाही.
- प्रत्येक विद्यार्थ्याजवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे सही शिक्क्याचे पत्र किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
- स्पर्धा नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम अधिकार स्पर्धा संयोजन समितीकडे राखीव आहे.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
- रजिस्ट्रेशनचा गुगल फॉर्म न भरल्यास स्पर्धक स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- स्पर्धकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
रजिस्ट्रेशन फॉर्म:
- स्पर्धकांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
- रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी लिंक – https://forms.gle/WTyC9STmSeisQpEe7
- स्पर्धकांनी प्रथम प्रवेश शुल्क भरून शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट (Screenshot) हा रजिस्ट्रेशन फॉर्मवर अपलोड करणे अनिवार्य आहे.
स्पर्धेचा दिनांक, वेळ आणि ठिकाण:
- दिनांक: २२ जानेवारी २०२५, बुधवार
- वेळ: सकाळी ९.०० वाजता
- ठिकाण: हॉल क्र. १८, आय्एल्एस् विधी महाविद्यालय, चिपळूणकर रोड (लॉ कॉलेज रोड), पुणे ४११००४
स्पर्धा समन्वयक:
- ऋग्वेद गाडगे, सहाय्यक प्राध्यापक
- मुग्धा हेडाऊ, सहाय्यक प्राध्यापक
अधिक माहितीसाठी संपर्क:
- मुग्धा लोहार (मो.नं. 7385820620)
- प्रद्युम्न खिरोडकर (मो.नं. 7875758519)
- प्रणव कराड (मो.नं. 9511654954)