Announcement


Notice Priod


Events


Dance for A Cause

arrowApr, 1, 2022

Symposium: RERA-2020

arrowNov, 26, 2020

ILSCA WEBINAR-2

arrowJun, 10, 2020

KREEDANAGAN 2019-2020

arrowJan, 28, 2020

Alumni Meet 2018

arrowDec, 14, 2018

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवकांसाठी आकाशवाणी पुणे यांची स्पर्धा!


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त युवकांमधील गुणवत्तेला संधी देण्याच्या हेतूने आकाशवाणी पुणे यांनी ‘#AIRNxt (#एआयआरनेक्स्ट)’ ही विशेष स्पर्धा आयोजित केली आहे. आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे येथे मंगळवार दिनांक 10/05/2022 रोजी सकाळी 10.30 वाजता Hall No. 5 (Auditorium) मध्ये ही स्पर्धा होईल. खाली दिलेल्या विषयांवर स्पर्धकांनी भाषण, कथाकथन, काव्यवाचन या माध्यमातून मराठी किंवा हिंदी भाषेत आपले विचार व्यक्त करावेत. प्रत्येक स्पर्धकास 3 मिनिटे वेळ मिळेल.

विषय:

  1. ‘माझ्या स्वप्नातला भारत आत्मनिर्भर भारताची माझी संकल्पना
  2. ‘नवी ‘ती’- सक्षम भारतीय कन्या एक भविष्यवेध
  3. मेक इन इंडिया स्किल इंडिया नव्या पिढीसमोरील संधी
  4. तरुणाईचे आदर्श आणि रोल मॉडेल्स (सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रातील)
  5. भारतीय मूल्ये आणि आचरण अर्थात पुन्हा खेडयांकडे हा राष्ट्रनिर्मितीचा पाया
  6. भारताची आगेकूच वैज्ञानिक संशोधन आणि औद्योगिक विकासात तरुणाई

(वरील नमूद केलेल्या व्यापक विषयांशी संलग्न विषयांवरही प्रस्तुती करणास परवानगी आहे.)

स्पर्धांमधून निवडलेल्या विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हे आणि आकर्षक बक्षीसे दिली जातील. या विजेत्यांना महाराष्ट्रभरात प्रसारित होणा-या #AIRNxt या कार्यक्रमासाठी RJ (Radio Jockey) (निवेदक) म्हणून काम करण्याची संधी मिळेल. या शिवाय स्पर्धेत सहभागी सर्वच स्पर्धकांचं ध्वनिमुद्रण आकाशवाणी पुणे केंद्राच्या युववाणी कार्यक्रमात प्रसारित करण्यात येईल.

इच्छूक विद्यार्थ्यांनी खालील गुगल फॉर्म भरून नावनोंदणी करावी.

https://docs.google.com/forms/d/1WY-NiY9bBAeVzUNH8mAVRBYzvmiFjkEm9_zMZmGBeTM/edit