मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२५ हा कालावधी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने महाविद्यालयामध्ये पुढील स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दिनांक २४/०१/२०२५ श्रुतलेखन (उतारा ऐकून त्याचे लेखन करणे) – शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धा
दिनांक २५/०१/२०२५ ‘कायद्याचे बोला’ सत्र
दिनांक २७/०१/२०२५ ‘स्वच्छंद’ सत्र- संतवाणी (संत तुकाराम यांच्या अभंगांवरील चर्चासत्र)
दिनांक २८/०१/२०२५ मराठी भाषा व साहित्यावर प्रश्नमंजुषा
सर्व कार्यक्रम सायंकाळी ४.४५ पासून हॉल क्र. २ मध्ये पार पडतील.
सर्वांनी या कार्यक्रमांत उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे ही विनंती.