सर्व अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जमाती (VJNT) (अ/ब/क/ड), इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागासवर्गीय (SBC), राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, मुलीना मोफत शिक्षण शिष्यवृत्ती योजना व इतर शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांकडून शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती/फ्रीशिपसाठी सन 2024-25 करिता ऑनलाईन पध्दतीने Fresh / Renewal अर्ज https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवरून मागविण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत: सदर शिष्यवृत्तीकरता शासनाने विहीत केलेले नियम व अटींच्या आधीन राहून ऑनलाईन अर्ज व खाली दिलेल्या फॉर्म भरून त्याची प्रत आवश्यक त्या स्व-साक्षांकित (Self-Attested) कागदपत्रांसह आय्एल्एस् विधी महाविद्यालय कार्यालय काउंटर नंबर १ येथे सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत जमा करावी.
MahaDBT पोर्टलवर शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना
१) विद्यार्थांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेला शिष्यवृत्ती/फ्रीशिप फॉर्म योग्य आहे, की तो परत पाठवलेला आहे अथवा इतर कागदपत्रामध्ये त्रुटी आहे हे स्वत: आपल्या महाडीबीटी लॉग-इन मधून सतत पाहत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती/फ्रीशिपचे कामकाज सोयीस्कर व नियमित होईल आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्रीशिप व राजर्षी शाहू शिक्षण शुल्क योजना व इतर सवलतीचे लाभ मिळणेस अडचण होणार नाही.
२) तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी Non Aadhar Based Registration केले आहे त्या विद्यार्थ्यांनी MahaDBT पोर्टलवर जाऊन आपला आधार क्रमांक त्वरीत अपडेट करावा. अन्यथा फी सवलत मिळणार नाही व महाविद्यालयाची उर्वरीत फी त्वरित भरावी लागेल याची नोंद घ्यावी.
३) फक्त अनुसूचित जाती (SC ) च्या विद्यार्थ्यांसाठी-या प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा केंद्र शासनातर्फे दिला जाणारा ६०% हिस्सा हा विद्यार्थ्यांच्या बँके खात्यात जमा होतो म्हणून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेला शिष्यवृत्ती फॉर्म मंजूर करण्यात आलेली संपूर्ण शिष्यवृत्ती रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्क इ.) तसेच विद्यार्थ्याला देय असणारा भाग (निर्वाह भत्ता) या दोन्ही भागांच्या एकत्रित रक्कमेचा केंद्र शासनातर्फे दिला जाणारा ६०% हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालयास देय असलेली रक्कम विद्यार्थ्याने महाविद्यालयास ७ दिवसाच्या आत जमा करणे अनिवार्य आहे.
४) विद्यार्थ्याची उपस्थिती ७५% अनिवार्य आहे.
टीप –
१. विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन फॉर्मची प्रिंटआउट,तसेच जोडावी लागणारी सर्व कागदपत्रे महाविद्यालयात जमा करावीत.
२. शिष्यवृत्ती/फ्रीशिप फॉर्म समाज कल्याण विभागाकडून नामंजूर झाल्यास महाविद्यालयाची उर्वरीत फी विद्यार्थ्यांना भरावी लागेल.
३. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थाने student login वेळोवेळी चेक करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन शिष्यवृत्ती/फ्रीशिप फॉर्म समाज कल्याण कडून नामंजूर झाला / परत पाठवला / इतर कागदपत्राकरता त्रुटीमध्ये राहिला आहे तर त्यांची कोणतीही सूचना महाविद्यालयाकडून दिली जाणार नाही.
अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख दि. २२-०२-२०२५ आहे.